राहुल निकम यांची ‘ दप्तर ‘ कथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राहुल निकम यांच्या बिजवाई कथासंग्रहामधील दप्तर या कथेचा कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित महाविद्यालयांमधील एफ. वाय. बी. ए. या वर्गाच्या ‘ वांग्मयीन मराठी ‘ या अभ्यासपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे.

 

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘ आधुनिक गद्य व पद्य वांग्मय प्रकार : स्वरूप विचार ‘ या अभ्यास पत्रिकेत कथा या वांग्मय प्रकारासाठी ‘ दप्तर ‘ या कथेचा समावेश करण्यात आला आहे. स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद यांच्या मार्फत प्रकाशित झालेला ‘ बिजवाई ‘ हा कथासंग्रह असून कथासंग्रहास राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, अस्मितादर्श वांग्मय पुरस्कार, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार, नेवासा, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांचा पुरस्कार तसेच भि.ग.रोहमारे, पोहेगाव यांचा उल्लेखनीय ग्रंथ असे वांग्मयीन पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच बिजवाई कथा संग्रहामधील अनेक कथांचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद झालेला असून हिंदी नियतकालिकांमध्ये कथा प्रसिद्ध आहे.

Protected Content