हिंदू खाटीक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुसंस्कृत व उत्तम विद्यार्थी हे देशाचे भावी भविष्य असते. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याची दखल घेतली पाहिजे त्यांच्या कला गुणांचा व मेहनत परीश्रमांची कदर जर प्रत्येक समाजाने घेतली तर विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळते. असा काहिशी दखल जामनेर येथील हिंदू खाटीक समाजाने घेऊन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत त्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

जामनेर येथील हिंदू खाटीक समाज मंडळाच्या वतीने समाज सुधारक श्री संतुजी लाड सभागृह या ठिकाणी खाटीक समाजाचे सेवानिवृत्त सैनिक गजानन लाड तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी ईशस्तवन तसेच स्वागतगीत कु. नंदिनी गंगतिरे हिच्या सुमधूर स्वराने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जामनेर नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा साधना महाजन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक बाबुराव हिवराळे तसेच सत्कारमूर्ती गजानन लाड हे होते.

सुनिल कलाल, सुभाष पवार, रमेश गंगतिरे, अनिल घन, संजय घन, पंडित मदाने, संजय कल्याणकर, वामन पवार, अशोक हिवराळे, यांच्या हस्ते द्विपप्रज्वन व प्रतिमा पुजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पवार यांनी मांडले. या प्रसंगी समाजाच्या वतीने गजानन लाड हे भारतीय सैन्य दलातुन सेवा निव्रुत झाल्याने त्यांचा जाहीर सत्कार साधना महाजन व समाज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पुलवामा व कुपवाडा या ठिकाणी तसेच सुमारे चोवीस वर्षे देशसेवा केली. समाजाने आपल्या देशसेवेची व कार्याची दखल घेऊन सत्कार केला याचे मनोगताने आभार मानले. नीट परीक्षा, सीईटी परीक्षा, एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय दहावी, बारावी, परीक्षा तसेच पाचवी ते आठवी परीक्षेत यश संपादन केलेल्या ५० विद्यार्थ्यांना सत्कार स्वरुप म्हणून स्म्रुतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषण माजी नगरसेवक बाबुराव हिवराळे यांनी तर मनोगत बाजार समिती सदस्य सुनिल कलाल, पितांबर कल्याणकर, निलेश पवार, मयुर पवार, यांनी व्यक्त केले. जामनेर तालुक्यातील पहुर, टाकळी, तोंडापुर, कुंभारी, खडकी, लोहारा तसेच बहुतांशी भागातील नागरिकांनी व समाज बांधवांनी उपस्थित राहुन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. गजानन मंडवे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गजानन घन सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद मदाने, अरुण पवार, विलास हिवराळे, अनिल कल्याणकर, अर्जुन हिवराळे, संदिप पवार , सुनिल मदाने, महेंद कल्याणकर, रवि रावळकर, समाधान हिवराळे, अविनाश कल्याणकर, अक्षय घन, सोनु कल्याणकर, राजु घन, कैलास मदाने, भारत पवार, गोपाल माजट्टे, गोकुळ गंगतिरे, आनंद गंगतिरे, स्वप्निल कवडकर, संतोष भोकरे, क्रुष्णा घन, भैय्या कल्याणकर,कैलास हिवराळे , नाना खाटीक, कैलास पवार, लोकेश कल्याणकर, शत्रुघ्न पवार, पुंजाजी कल्याणकर, कलाल सर, शिवाजी मदाने, श्याम रावळकर, अजय कल्याणकर, संजय कल्याणकर, प्रभाकर साळवे, सुधाकर साळवे, श्रीराम घन, भगवान मदाने, तसेच तालुक्यातील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content