चिंचोली शिवारातून व्यापार्‍याची दुचाकी लंपास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली शिवारातून राधाकृष्ण  मंगल कार्यालयासमोरून व्यापाऱ्याची दुचाकी लांबिवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धालवडी येथे राजेंद्र एकनाथ मानके  हे वास्तव्यास आहेत. राजेंद्र मानके हे कामानिमित्ताने १३ मार्च रोजी चिंचोली शिवारातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आले होते. यादरम्यान त्यांनी मंगल कार्यालयासमोर त्यांची एम.एच १९ बी.के.२११३ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. दुपारी काम आटोपून परत जाण्यासाठी निघाले असता त्यांना मंगल कार्यालयासमोर उभे केलेले त्यांची दुचाकी मिळून आले नाही तीन ते चार दिवस सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने अखेर राजेंद्र मांडके यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहेत

 

Protected Content