फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मानसिक आरोग्याचा परिणाम आपले काम , शारीरिक आरोग्य आणि कुटुंबावर होत असतो. मन हलके झाले कि अनेक मार्ग दिसतात. मानसिक आरोग्याचा परिणाम वागणुकीवर होतो, असे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी फैजपूर येथील पोलिसांसाठी डॉ . केतकी पाटील फाऊंडेशन आयोजित जगावे आनंदे मानसिक आरोग्य संवाद कार्यक्रम प्रसंगी केले .
यावेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, सपोनि निलेश वाघ, पोउनि सैय्यद , डॉ. विलास चव्हाण, डॉ. बबन ठाकरे उपस्थित होते. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन तर्फे “जगावे आनंदे” मानसिक आरोग्य उपक्रम पोलिसांसाठी राबविला आहे.
या अंतर्गत १० रोजी फैजपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना मानसिक आरोग्याचा परिणाम आपले काम , शारीरिक आरोग्य आणि कुटुंबावर होत असतो. मन हलके झाले कि अनेक मार्ग दिसतात. मानसिक आरोग्य जपले पाहिजे असे सांगितले.
डीवायएसपी डॉ. सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनात मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. वर्क बॅलेन्स सांभाळता आला पाहिजे अन्यथा कुटूंबात तणाव निर्माण होतो असे सांगितले. डॉ . विलास चव्हाण यांनी मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती आवश्यक आहे.
स्ट्रेस वाढत राहिला तर त्याचे रूपांतर आत्महत्येच्या विचारा पर्यन्त जातो असे स्पष्ट केले. डॉ. बबन ठाकरे यांनी माईंड सेट बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोउनि सैय्यद तर आभार सपोनि निलेश वाघ यांनी मानले.