पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव, व सावखेडा बु” ता. पाचोरा येथील युवा मंडळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विशेष मेगा स्वच्छ भारत अभियान सावखेडा बु” ता. पाचोरा येथे दि. १९ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले.
अभियानाचा मळ उद्देश “स्वच्छ भारत, निर्मल भारत” अशा संदेश प्रत्येकां पर्यंत पोहचावा असा आहे. सदरील अभियानात नेहरू युवा केंद्र, जळगाव चे जिल्हायुवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका समन्वयक मनोज पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी सावखेडा बु” येथे जिल्हा परिषद शाळेचा परिसर आणि ग्राम पंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील युवा मंडळ यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत याचा संदेश देण्यात आला. शाळेतील विद्यार्थी यांनी घोषणांच्या माध्यमातून स्वच्छ भारत याविषयी सकारात्मक संदेश दिला.
नेहरु युवा केंद्र जळगांव यांच्या वतीने समन्वयक मनोज पाटील यांनी “क्लिन इंडिया 2.0” याची माहिती देण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्या प्रतिबंध तसेच कचरा व्यवस्थापन याविषयी ग्रामस्थांना जागृत करण्यात आले. या अभियानास जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला वानखेडे, शिक्षिका सुषमा गोसावी, युवा मंडळ अध्यक्ष मनिष सोनवणे, सचिव निलकंठ पाटील, सदस्य मनोज परदेशी, अविनाश वाघ, गोलू पाटील, अधिकार पाटील, समीर तडवी, मनोज परदेशी, सचिन परदेशी, अकबर तडवी, हर्षल सोनवणे गावातील सामजिक कार्यकर्ते कैलास तांबे, दिपक परदेशी, रघुनाथ वाघ, संजू सोनवणे, बंडू तडवी, गोविंद परदेशी, ईश्वर परदेशी, सुभाष परदेशी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.