मैत्रेयाज कंपनीतील ठेवी तातडीने परत मिळवून द्या ! (व्हिडीओ )

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रेयाज सर्व्हिसेस कंपनीत अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तातडीने मिळाव्यात या मागणीसाठी खान्देश कन्या व महिला विकास मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना बुधवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मैत्रियाज सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड तसेच मैत्रेय प्लॉटर्स ॲण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीत जळगाव जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या आहे. गेल्या काही वर्षापासून मैत्रियाज सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनी बंद पडल्याने अनेकाचे पैसे अडकून पडले आहे. यात हातउसनवारी करणारे मजूर, सेवानिवृत्त झालेले, शेतकरी, मजूरीचे काम करणारे कारागीर यांनी आपला कष्टाच्या पैशांची गुंतवणूक केली. जळगाव जिल्ह्यातून अंदाजे ७ ते ८ लाख ठेवीदार आहेत. ठेवीदारांनी यापुर्वी अनेकदा शासनाकडे तक्रारी देण्यात आल्या. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबंधित विभागाकडून अर्ज देखील भरण्यात आला. परंतू अद्याप कोणताही गुंतवलेला पैसा मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करून मैत्रियाज सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड तसेच मैत्रेय प्लॉटर्स ॲण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमीटेड मध्ये अडकलेल्या ठेवी तातडीने परत मिळवून द्याव्यात अशी मागणीचे निवेदन बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले.

याप्रसंगी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा मंगला बारी, प्रमिला बारी, भुपेंद्र शिनकर, वसंत बारी, राजेंद्र बारी, संजय बारी, विलास खडके, शोभा बारी, निर्मला बारी, सुरेखा बारी, धनराज कोळी, कासाबाई बारी, वंदना बारी, छाया बारी, सुषमा बारी, रेशम बडगुजर, निलू इंगळे, शारदा इंगळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3255504448026476

 

 

Protected Content