Home Cities यावल फैजपुरच्या शीतल अकॅडमीत मेगा पब्लिक स्पिकिंग स्पर्धा

फैजपुरच्या शीतल अकॅडमीत मेगा पब्लिक स्पिकिंग स्पर्धा

0
58

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शीतल अकॅडमीत आज जिल्हास्तरीय पब्लीक स्पीकींग स्पर्धा उत्साहात पार पडली.

आज दिनांक २८ मे रोजी शितल अकॅडमी फैजपूर येथे जिल्हास्तरीय पब्लिक स्पिकिंग स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये चार ब्रांचेस ने भरभरून प्रतिसाद दिला प्रत्येकी ब्रांचचे बेस्ट स्पीकर या ठिकाणी निवडण्यात आले तसेच स्पर्धेचा प्रथम क्रमांक साक्षी शेलार मुक्ताईनगर हिने पटकावला तसेच दुसरा क्रमांक रोहन नरवाडे फैजपूर तसेच तिसरा क्रमांक पूर्वा देवकर सावदा यांनी पटकावला,
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीलिमा पाटील मुख्याध्यापक स्वराज इंग्लिश मीडियम स्कूल कळमोदा तसेच मुकेश पाटील खामगाव हे होते. तसेच शितल अकॅडमी फैजपूर ची विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री मंडवाले९३% हिने १२ वी स्टेट बोर्ड मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला , तसेच तनुश्री सोनवणे ८९% हिने ( डी एन कॉलेज फैजपुर ) मधून प्रथम क्रमांक पटकाविला या दोघ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि निर्भयपणे बोलता येण्यासाठी शितल अकॅडमी अशा विविध स्पर्धा आयोजन करत असते ज्यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपलं व्यक्तिमत्व फुलवत असतात.


Protected Content

Play sound