अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| आगामी काळात येणार्या लोकसभा व विधानसभेचे आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपरिषद कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की,आगामी काळात होणार्या निवडणुकीची आचारसंहिता भंग होणार नाही.याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.निवडणूक काळात सर्व विभाग एकत्र काम करतात. निवडणूक प्रक्रिया ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची होणार आहेत.याबाबत आदर्श आचारसंहिता चे नियोजन करण्यात आले आहे.या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून त्यात स्वतंत्र संगणक व आय टी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.तर दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होत होत्या.त्यात ह्यावर्षी बदल करण्यात आला असून ज्या दिव्यांग बांधवास मतदान केंद्रापर्यंत पोहचता येत नाही.याची अधिकारयामार्फत चौकशी करण्यात येईल व त्यात सत्यता आढळली तर त्या मतदार बांधवांसाठी एक मतदान केंद्र तो झोपत असलेल्या खाटेजवळ लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, गरोदर महिला व वृद्धांना असून एकही मतदार मतदानापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.तालुक्यातील जे गुन्हेगार कारवाई करून तालुकाबाहेर काढण्यात आले आहेत.त्यांना मतदानासाठी सकाळी वेळ ठरवून देण्यात आली आहे.त्यावेळेत ते येऊन मतदान करून त्यांची पुन्हा रवानगी करण्यात येणार आहे.महिला मतदारांची संख्या वाढावी यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली आहे.या निवडणुकीत कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना निवडणूक प्रक्रिया वस्तुनिष्ठ पद्धतीने कशी पार पाडावी या साठी तयार करण्यात येतील.तालुक्यातील अति संवेदनशील मतदान केंद्रावर प्रशासनामार्फत बारीक नजर ठेवण्यात येईल.संवेदनशील व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.या भागात जास्तीतजास्त मतदारांची जनजागृती करण्यात येईल.संवेदनशील मतदान केंद्रावर जादाचा पोलीस बंदोबस्त लावून त्या मतदान केंद्रावर वेब कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदळवार,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,मुख्याधिकारी तुषार नेरकर,उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.