यावल ( प्रतिनिधी ) येथील पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ .पंजाबराव उगले यांनी आज भेट देवुन गणेशोत्सव आणी मोहरमच्या सणानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला .
यावल शहरासह परिसरात बुधवार दिनांक २६ ऑगस्ट या दिवसी होणाऱ्या पाच दिवसाच्या श्रीगणेश विर्सजन आणी दिनांक ३० ऑगस्ट रोजी मुस्लीम बांधवांचे मोहरमचे ताजीया आणी दिनांक ३ सप्टेंबर रोजी साजरे होणाऱ्या संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या जशने-ए-पहेरहनच्या काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा आढावा पोलीस अधिक्षक डॉ .पंजाबराव उगले यांनी यावल पोलीस स्टेशनला भेट देवुन प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण , पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद रवांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळ्पकर यांच्याकडुन संपुर्ण कार्यक्रमाचा आढावा जाणुन घेत , कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या नियमांचे पालनाची काटेकोर अमलबजावणी व्हावी व कायदा सुव्यवस्थे संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनास मार्गदर्शन देवुन सुचना दिल्या.
दरम्यान बुधवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी गणेश विसर्जना निमित्ताने यावल शहरातील संपुर्ण बाजारपेठ बंद राहील असा सुचना पोलीस प्रशासनाच्या व यावल नगर परिषदच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले आहे .