किनगाव येथे उद्या शिवसंपर्क अभियानाची बैठक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चोपडा विधानसभा क्षेत्रातील किनगाव-डांभूर्णी व साकळी-दहीगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांसाठी शिवसेना शिवसंपर्क अभियान बैठकीचे उद्या रविवार (दि.२५) रोजी दुपारी २.०० वाजता किनगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आली आहे.

या शिवसेना शिवसंपर्क अभियान मोहीम माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे (माजी आमदार चोपडा व रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख) व आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. सदर बैठकीस चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते व पदधिकारी यांना पक्षाअंतर्गत संघटना बांधणी व आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. 

तरी शिवसेनेच्या या शिवसंपर्क अभीयान सर्व शिवसैनिकांनी व शिवसेना पदाधिकारी यांनी बैठकीस प्रामुख्याने  उपस्थित राहावे ही असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Protected Content