Home Cities अमळनेर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची २७ मे रोजी सभा

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची २७ मे रोजी सभा


download

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदानावर नियुक्त डी.सी.पी.एस. (अंशदायी पेंशन) योजनाधारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सभा सोमवारी (दि.२७ मे) दुपारी २.०० वाजता जळगाव येथे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत आयोजित करण्यात आली आहे.

 

या सभेत अंशदायी पेंशन योजनेबाबत करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तरी संबंधित सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु-भगिनींनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष जे.के. पाटील, सेक्रेटरी जी.आर्. चौधरी तसेच माध्यमिक शिक्षक संघातर्फे अध्यक्ष एच्.जी. इंगळे व सेक्रेटरी एस्.डी. भिरूड यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound