नवीदिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक आज झाली असून यात नागरिकत्व दुरूस्तीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसने आज नागरिकत्व दुरुस्तीच्या कायद्याविरोधात विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत १४ पक्षांची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात एकजूट झाली. याप्रसंगी माकप, भाकप, राजद, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस सह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. तथापि, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली नाही. यामुळे विरोधकांमध्ये यावरून फुट पडल्याचे संकेत मिळाले आहेत.