मुंबई प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. जरी हे बहुमत मिळाले असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून युद्ध रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आज दुपारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची मतदेखील जाणून घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा कल जाणून घेणार आहेत. तसंच यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.