भुसावळ प्रतिनिधी । शहरातील माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली असून या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा 12 फेब्रुवारी 2021 रोजी होणार असल्याने आज रोजी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्ह्याध्यक्ष रविंद्र पाटील, रविंद्र पाटील, जी.प सदस्य, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे तसेच महिला पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. माजी आमदार संतोष चौधरी यांनी येणाऱ्या निवडणुकी नगरपालिका, पंचायत समिती तसेच विकास सोसायटी तसेच जळगांव जिल्ह्यातील कुठलीही निवडणूक असो यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.असे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले.तसेच वरणगाव नगरपरिषदेची आगामी निवडणूक लवकरच होणार आहे यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जोमाने कामाला सुरुवात करा असे कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
सायकल रॅली
दुपारी 3 वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून जयंत पाटील यांच्या आगमनानिमित्त हजारो कार्यकर्यांच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून ही रॅलीची सांगता तेली समाज मंगल कार्यलयात होणार आहे. या नंतर कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच संपूर्ण भुसावळकरांचे या सभेकडे लक्ष लागून आहे.