मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक आज दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलावण्यात आले असून यातूनच किती जण अजित पवारांसोबत गेले आहेत हे दिसून येणार आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आता त्यांच्यासोबत पक्षातील नेमके किती आमदार जाणार आहेत ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर, आज दुपारी साडेचार वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीने नवनिर्वाचीत आमदारांची बैठक बोलावली आहे. यात आता नेमके किती आमदार उपस्थित राहतात आणि कोण दांडी मारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात अनुपस्थित राहणारे आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील ही बाब उघड असल्याने याबाबत उत्सुकता लागली आहे.