जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेकडे तारण असलेल्या वसंत साखर कारखाना, जे.टी.महाजन सूतगिरणी तसेच खडका सूतगिरणी या साखर कारखान्यांचे मालमत्त्तांचे फेरमूल्यांकन करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सुतोवाच जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी केले.
वसंत साखर कारखाना, जे.टी.महाजन सूतगिरणी तसेच खडका सूतगिरणी या जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या उद्योगांना देण्यात आलेले बँकेचे अर्थसहाय्यापोटी जवळपास ८० ते ८३ कोटीचे कर्ज थकीत आहे. उद्योगांना देण्यात आलेले बँकेचे अर्थसहाय्यापोटी बरेच कर्ज थकीत आहे. हे उद्योग आजच्या स्थितीत बंद अवस्थेत आहेत. या मालमत्तांचा थकीत रकमांच्या वसूली बाबत या मालमत्त्तांचे फेरमूल्यांकन करून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया व मालमत्ता विक्री संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी केले होते.
जिल्ह्याचे वैभव असलेल्या वनकुठे (कासोदा) येथील वसंत साखर कारखाना गेल्या २० ते २२ वर्षांपासून अवसायनात गेल्याने बंद अवस्थेत आहे. या कारखान्यास जिल्हा बँकेमार्फत करण्यात आलेल्या अर्थसहाय्यापोटी कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण आहे. या कारखान्यास करण्यात आलेल्या अर्थसहाय थकीत असून कर्ज वसुलीसाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने उद्योगाची मालमत्ता अत्यंत जीर्ण झाली आहे.
बँकेचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कारखानायाच्या मालमत्तेचे फेरमूल्यांकनकरून त्याची पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया अंमलबजावणी करणे जेणेकरून मालमत्ता घेणारी कंपनी नव्याने कारखाना सुरु करू शकेल. शिवाय यावल तालूक्यातील न्हावीमार्ग येथील दादासाहेव जे.टी.महाजन सूतगिरणी बंद आहे. तसेच खडका येथील सुतगिरणीची यंत्रसामग्रीदेखील शिल्लक नाही, परन्तु खडक सूतगिरणीची १७ एकर जागेच्या विक्री व निविदा प्रक्रिया संदर्भात देखील आज जिल्हाबँक संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बँकेकडे तारण असलेल्या वसंत साखर कारखाना, जे.टी.महाजन सूतगिरणी तसेच खडका सूतगिरणी या साखर कारखान्यांचे मालमत्त्तांचे फेरमूल्यांकन करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले. यावेळी, उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, डॉ.सतीश पाटील, संजय पवार, महापौर जयश्री महाजन, प्रतापराव हरी पाटील आदी संचालक उपस्थित होते.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1208620296339255