फळ पिक विमा योजने संदर्भात जळगावात बैठकीचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । शहरात फळ पिक विमा योजने संदर्भात (दि.११) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग व बँक अधिकाऱ्यांची खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सन २०२१-२२ च्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतुन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यास वगळण्यात आलेली असुन, याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना अनेक शेतकऱ्यांच्या दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष तक्रारी येत असुन, यामुळे यावल तालुक्यातील शेतकरी नाराज असुन त्यांचा शासनावर मोठा रोष दिसून येत आहे. यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिक घेतले जात असते, परंतु कृषी विभागाकडून सन २०२१-२२ च्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतुन यावल तालुक्याला वगळण्यात आलेले आहे.

याची तत्काळ दखल घेत खासदार रक्षाताई खडसे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून येत्या मंगळवारी (दि.११) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे कृषी विभाग अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी व बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करणे बाबत सूचना केल्या.

 

Protected Content