यावल महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धेत चारूलता पाटील प्रथम तर देवेंद्र बारी द्वितीय

यावल , प्रतिनिधी l येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजव्दारे संचलित यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत एफ.वाय.बी. एस्सीची विद्यार्थिनी चारुलता उमाकांत पाटील हिने प्रथम क्रमांक पटकवला.

 

प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. पवार यांनी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण ९३ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देवेंद्र पंढरीनाथ बारी (एफ.वाय.बी. एस्सी) तर तृतीय क्रमांक मयुरी गोविंदा बारी (एफ.वाय.बी. एस्सी) यांनी मिळवला. तसेच अक्षय दिलीप मराठी (टी. वाय. बी. एस्सी.) व प्रीती दिलीप निळे (एफ.वाय.बी. एस्सी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. सदर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

 

Protected Content