अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

पाचोरा, प्रतिनिधी | येथील अनिलदादा देशमुख महाविद्यालयालयातील द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यात सुप्रीया कुलकर्णी, हर्षीता सोनार व स्वाती बच्छाव यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

कलसंचालनालय म. रा. मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा कला शिक्षक प्रशिक्षण वर्ग (ए. टी. डी.) द्वितीय वर्ष या वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात अनिलदादा देशमुख महाविद्यालय, पाचोरा येथील प्रथम क्रमांक कुलकर्णी सुप्रिया विलास , द्वितीय क्रमांक सोनार हर्षिता श्रीकिशन व तृतीय क्रमांक बच्छाव स्वाती मदनलाल हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

गतवर्षीप्रमाणे यावर्षी पण १०० टक्के निकालाची परंपरा कायम असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, सचिव नरेश मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप पाटील, प्रा. निलेश शिंपी, कलाशिक्षक प्रमोद पाटील, सुबोध कांतायन, जितू काळे, राहुल पाटील, संदीप परदेशी, देसले फाउंडेशन चे अध्यक्ष देसले, राहुल सोनवणे तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!