उद्या वधूवर परिचय मेळावा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीयस्तरीय चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय व पालक मेळावा उद्या रविवारी (६ नोव्हेंबर) सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

चर्मकार विकास संघाने मेळाव्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मेळाव्यासं प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चर्मकार विकास संघाने आयोजित मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो विवाह जुळले आहेत. हा मेळावा निशुल्क असणार आहे. हा मेळावा सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार आहे. यात  वधु-वरांच्या परिचय देण्यात येणार आहे.  या मेळ्याव्यात सहभागी होण्याचे आवाहन  संघाचे राज्य कार्यकारीणी सदस्य संजय वानखेडे, विश्वनाथ सावकारे, वसंतराव नेटके, जिल्हाध्यक्ष चेतन तायडे, जिल्हा सचिव धनराज भारुडे, अड. अर्जुन भारुडे, विजय पवार, संजय भटकर ज्योती निंभोरे,  आदींनी केले आहे.

 

Protected Content