धरणगावात मेडिकल फोडले ; ७ हजाराचा मुद्देमाल लंपास

धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी येथील मेडिकल फोडून 7 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की.कल्पेश सुभाष श्रीखंडे वय 28 राहणार पाळधी बुद्रुक ता.धरणगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. 18 ऑक्टोबर रोजी रात्री ते नेहमी प्रमाणे 8 वाजता दुकान बंद करून घरी गेले, त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल फोडून दुकानातील 7 हजार रुपये किमतीचे मुद्देमाल आणि रोकड चोरून नेल्याचे 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीला आले या प्रकरणी कल्पेश श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण निकुंभ करीत आहे.

 

 

Protected Content