नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीतील साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांच्या 5 महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. याशिवाय मानहानीच्या प्रकरणात दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले आहे.
ट्रायल कोर्टाच्या 31 जुलैच्या आदेशाला मेधा यांनी आव्हान दिले होते. ज्यामध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी त्यांना मानहानीचे दोषी ठरवले. तसेच एलजी सक्सेना यांना नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. साकेत कोर्टाने सोमवारी २९ जुलै रोजी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मेधा पाटकर यांना जामीन मंजूर केला आहे.