जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरात होणाऱ्या अस्वच्छतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होता. महापौर जयश्री महाजन यांनी आज २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गोलाणी मार्केट परिसरात अस्वच्छतेची पाहणी केली. कचरा आढळून आल्याने अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेबाबत सुचना दिल्यात.
गेल्या आठवडाभरापासून शहरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात गोलाणी मार्केट देखील बंद आहे. याकाळात महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याच्या तक्रारी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महापौर जयश्री महाजन यांनी गोलाणी मार्केट परीसरात अस्वच्छतेची पाहणी केली. तसेच मार्केटच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा दिसल्याने त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.यावेळी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी, तुषार वाघुळदे , ललित धांडे , आरोग्य विभागाचे कर्मचारी कांबळे आणि काही गाळेधारक उपस्थित होते.
मार्केटमध्ये होत असलेली गळती , सुकलेले झाडे आदींची पाहणी केली. मंगलाताई बारी यांनी विविध समस्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर महापालिका अग्निशमन दलाच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडून काही अपेक्षा ही व्यक्त केल्यात.