फैजपुर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पिंपरुड तालुका यावल येथे मातोश्री फाउंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नुकतेचे करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 108 गरजू नागरिकांनी मोफत तपासणी करून औषधीचा लाभ घेतला आहे. यात 11 नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया कांताई नेत्रालय जळगाव येथे मातोश्री फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार आहे. तर 15 नागरिकांनी चष्माचा लाभ घेतला आहे. शस्त्रक्रियासाठी 11 रुग्णांना पिंपरुड ते जळगाव येण्या-जाण्याची व जेवणाची, राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली. या शिबिराचे यशस्वीतेसाठी कांताई नेत्रालय, जळगावचे जिल्हा कॅम्प व्यवस्थापक युवराज देसरडा, चिकित्सक अभिषेक पयासी, वैभव चौधरी, दर्शन व मातोश्री फाऊंडेशन अध्यक्ष जनार्दन जंगले, सचिव बाळकृष्ण खडसे, उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, मुख्याध्यापिका शालिनी चौधरी, यांनी अथक परिश्रम घेतले. याशिबिर अंतर्गत फैजपुर, पिंपरुड, विरोदा, वडोदा, आमोदा, कळमोदा, सावदा व परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.