वरणगाव नगरपरिषदेवर मटके फोडो आंदोलन

वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेत पिण्याच्या पाण्यासाठी मटके फोडो आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

वरणगाव शहर हे पन्नास हजार लोकसंख्येचे शहर असून शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरच हातनूर धरण आहे. तरीसुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला या प्रमाणे गावातील नागरिकांनाचे हाल होत आहेत. नगरपरिषदेच्या वतीने दहा ते बारा दिवस आड पाणी मिळत असल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव नगरपरिषदेवर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. या आंदोलना प्रसंगी मातीचे मटके फोडण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी ग्रुपचे अध्यक्ष शशिकांत चौधरी यावेळी बोलताना म्हणाले की, आज भाजपने मडके फोडले आहे. दहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्ही नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे डोके फोडू अशा इशाराही यावेळी छत्रपती ग्रुपच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Protected Content