अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांचे पाडळसरे धरणासाठीचे आंदोलन सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. याचदरम्यान काल (गुरुवार) मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी काल रात्री पेट्रोल टाकून आंदोलन मंडप स्टेज व बॅनर, परदे जाळल्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर सत्ताधारी गटाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा देखील श्री.चौधरी यांनी केला आहे.
उपोषणस्थळी आतापर्यंत माजीमंत्री अरुण भाई गुजराती गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील व अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी धरणाच्या उपोषणाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे सध्या उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा व प्रतिसाद वाढत असताना हे उपोषण बंद व्हावे, यासाठी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील पंचायत समितीसमोर उत्कर्ष समितीने गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. समितीचे सदस्य व कार्यकर्ते तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये जाऊन लोकांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे काम करीत आहेत. या दरम्यान उपोषणस्थळी लावलेले बोर्ड काही समाजकंटकांनी जाळले आहे. तसेच धरण उत्कर्ष समिती सुभाष चौधरी यांनाही रात्री अपरात्री रात्री-अपरात्री फोन करून हे उपोषण थांबवा, अशा धमक्या येत आहेत. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दबाव आणला जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून सत्ताधारी गटाकडून हा दबाव येत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज सायंकाळी आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्ते भोजराज पाटिल यांनी गोविंद पानसरे यांचे पुस्तक वाटलेत.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणार
साखळी उपोषण आंदोलन शांततेच्या मार्गाने जोर धरत असतानाच आज मंडपाला आग लावून अज्ञात समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रात्री २ वाजेच्या सुमारास संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांना एका दूरध्वनीद्वारे आंदोलन मंडप व बॅनर ला आग लागली असल्याचा निरोप मिळाला.तत्परतेने घटना स्थळी पोहचले त्यावेळी रेतीच्या गाडीवरील काही लोकांनी बॅनर ,परदे व स्टेजच्या प्लायवूडला नुकतीच लागलेली आग विझवली. २० फूट रुंदी असलेल्या ५ एप्रिलच्या भव्य मोर्चाच्या बॅनरवरील एकबाजूचे मोर्चेकरी सुभाष चौधरी, मधोमध असलेले रणजित शिंदे,व कोपऱ्यावरील श्याम अहिरे, सेनेचे विजय पाटिल यांचे चेहरे जाळण्यात आलेले होते. वेळीच उपस्थितांनी दाखवलेल्या तत्परतेने संपूर्ण मंडप जाळण्याचे षडयंत्र उधळले गेले.चौधरी यांनी पोलिस स्टेशनला रात्रीच घटनेबाबत माहिती दिली.आंदोलन स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर यांनी पोलीसासह भेट देऊन पाहणी केली तर परिसरातील cctv ची पाहणीही करण्यात येणार आहे. या घटनेचा समितीने जाहीर निषेध करीत दिवसभर आंदोलकांनी आज संयम ठेवत आंदोलन नेटाने चालविले.
जाळपोळीचा जाहिर निषेध
समाजकंटकांकडून झालेल्या जाळपोळीचा जाहिर निषेध संघर्ष समितीचे सुभास चौधरी, प्रा.शिवाजीराव पाटिल,डी. एम.पाटिल, एस.एम.पाटिल, सुनील पाटिल, देविदास देसले,योगेश पाटील, प्रशांत भदाणे, सतिष काटे,रणजित शिंदे,महेश पाटील,रामराव पवार,किरण पारधी, आर.बी पाटील, आदींनी नोंदविला आहे.
विविध मान्यवरांची हजेरी
चोपडा येथील माजी आमदार कैलास पाटिल यांनी आज आंदोलनस्थळी भेट दिली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरणाच्या कामासाठी पाठपुरावा करू, असे सांगत चोपडा तालुक्यासह आंदोलनास शिवसेनेचा पाठींबा जाहीर केला. यावेळी सेनेचे डॉ.राजेंद्र पिंगळे,तालुकाप्रमुख विजय पाटील,नितीन निळे हजर होते. गावरान जागल्या संघटनेचे विश्वास पाटिल यांनी घणाघाती भाषण करून शासनाचा नाकर्तेपणा मांडला.त्यांच्यासह गडखांब येथिल रमेश पाटिल उपस्थित होते.तापी पाटबंधारे विभागाचे इंजिनिअर डी. टी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. श्री व्यापारी असोसिएशनतर्फे महेश कोठावदे,प्रकाश जैन,विवेक भांडारकर, पुरुषोत्तम शेटे, बिपीन कोठारी,मछिंद्र पाटिल, निलेश कोठारी यांचेसह आधार बहुद्देशीय संस्थेच्यावतीने महिला कार्यकर्त्या,धनगर दला पाटील, संदिप मल्हारी पाटिल,संजय पूनाजी पाटिल, पाडळसे पुनर्वसन समितीचे भागवत पाटील,विकास पाटील,प्रा.पी.के.पाटिल, नरेंद्र पाटिल, मराठा समाज मंडळाचे पदाधिकारी सुरेश सोनवणे,श्रावण पाटील, योगेश पाटिल, गोवर्धनचे नवल पाटील ,गुलाबराव पाटिल, बन्सीलाल पाटिल, दिलीप पाटिल, अनिल पाटील आदिंसह मारवड बोहरा उपसा सिंचन योजनेचे शिवाजीराव पाटील व पदाधिकारी,कृ.उ.बा. संचालक धुडकू पाटिल सावखेडा,शेकडो लोकांनी उपस्थिती लावली.