जिल्हा परिषदेचा अभियंता व शिपाई एसीबीच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याकडून लाच मागणारा जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता व शिपायाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

जि.प.बांधकाम उपविभागाचा कनिष्ठ अभियंता पी.डी.पवार वय( ५४ रा.प्लॉट क्रमांक २० गौरी पार्क वीर सावरकरनगर पिंप्राळा) असे तर मंगेश गंभीर बेडीस्कर,( वय ३५ रा.प्लॉट क्रमांक ५ पार्वती नगर मोहाडी रोड) असे शिपायाचे नाव आहे. तक्रारदार हा सुशिक्षित बरोजगार अभियंता आहे. नोंदणीकृत सुशिक्षित बरोजगार अभियंत्यांना शासनाची कामे देण्यात येतात. त्यानुसार त्यांना जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयामार्फत काँक्रिटीकरणाचे कंत्राट मिळालेले होते. त्या कामाचे बील मंजूर करण्याच्या मोबदल्यास आरोपी पवार व बेडीस्कर यांनी ११ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष ४ हजार ५०० रूपयांच्या लाचेची मागणी केली. ती लाच मिळवण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस नाईक मनोज जोशी, श्यामकांत पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

Add Comment

Protected Content