भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ एमआयडीसीतील एका कंपनीजवळ असलेल्या गवताला प्रकरणातील प्रवास अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी 6 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास लागली. या आगीत कंपनीचे कोणतेही नुकसान झाले नाही. 2 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले व ही आग आटोक्यात आणली..
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एमआयडीसी परिसरातील ग्रफाईड पावडर बनविण्याच्या कंपनीजवळ असलेल्या गवताला गुरुवारी 6 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझविण्यात आली. या आगीत कोणतेही नुकसान झाले नाही.