जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातील शेतात असलेल्या दादर चाऱ्याला अचानक आग लागल्याने ३६ हजार रूपये किंमतीचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी २२ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातील शेत गट नंबर १०२२ मध्ये निवृत्ती प्रभाकर बोरोले वय ४९ रा. कानळदा जि.जळगाव यांचे शेत आहे. शेतात दादरचा चारा ठेवण्यात आला आहे. दरम्यान २१ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता त्यांच्या शेतातील दादर चाऱ्याला आग लागल्याने त्यांच्या ६०० चाऱ्याच्या पेढ्या जळून खाक झाल्या आहेत. यासंदर्भात निवृत्ती बोरोले यांनी जळगाव तालुका पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.