Home Cities जळगाव वराह जयंतीनिमित्त जळगावात सामूहिक पूजन सोहळा; आ. राजूमामा भोळे व महापौर दीपमाला...

वराह जयंतीनिमित्त जळगावात सामूहिक पूजन सोहळा; आ. राजूमामा भोळे व महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगवान श्री विष्णूंच्या वराह अवताराचे स्मरण करून देणारी वराह जयंती जळगावात धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली. सकल हिंदू समाज जळगावच्या वतीने आयोजित वराह जयंती पूजन सोहळ्यात सकाळी ११.३० वाजता आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते भगवान श्री वराह यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर व भाविकांनी भगवान श्री वराह यांचे दर्शन घेत पूजन व आरती केली. वराह अवतार हा पृथ्वीच्या उद्धाराचे प्रतीक मानला जात असल्याने या जयंतीनिमित्त धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माची रक्षा, संस्कृतीचे संवर्धन आणि सामाजिक एकता यावर भर देण्यात आला. मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहून सामूहिक पूजनात सहभाग घेतला.

आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. धार्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound