अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवाड येथील सू. हि. मुंदडे हायस्कूलचा इ. १०वी चा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान ललित राजेंद्र पाटील (८४.४०) या विद्यार्थाला मिळाला आहे.
शाळेतील ७० विद्यार्थ्यांपैकी एकूण ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक ललित राजेंद्र पाटील (८४.४०%) याने पटकावला असून द्वितीय क्रमांक कविता सुरेश पाटील (८३.२०%) व तृतीय क्रमांक अनिकेत नंदकिशोर कुंभार (७९.४०%) यांनी मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष एल. एफ. पाटील, सेक्रेटरी दिनेश शिसोदे व सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य एल. जे. चौधरी, पर्यवेक्षक एच. एस. साळुंखे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.