चोपडा येथे विवेकानंद विद्यालयाचा निकाल ९९.२४ %

7bdccb3f cbbc 4763 a819 3b5e6ca76d76

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयाचा निकाल ९९.२४ % लागला आहे. शाळेतून १३३ विद्यार्थी यावेळी परीक्षेत प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ९० % च्या वर १९ विद्यार्थी, विशेष प्राविण्य ५७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ४३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत नऊ विद्यार्थी तर पास श्रेणीत चार विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.

 

चोपडा तालुक्यातून व विद्यालयातून योगेश कांतीलाल पाटील ९७.२० % प्रथम, प्रथमेश अनिल कोठावदे ९७ % द्वितीय तर तालुक्यातून तृतीय व मुलींमध्ये प्रथम अनुष्का रवींद्र पाटील ९६.४० %, चतुर्थ भाग्येश राजेंद्र सोनवणे व सृष्टी सुशीलकुमार सूर्यवंशी ९५.८०% पाचवी ओजस्विनी भरत पाटील ९५.६० % यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

याशिवाय शाळेतून तुषार शशिकांत बागुल व मनस्वी जनार्दन विसावे ९४.६०%, मयूर किरण पाटील ९४.४० % , अजय धनराज पाटील ९३.४० %, आशय लोकेन्द्र महाजन ९३ %, ऋतुराज प्रवीण पाटील ९२.८० %, सृष्टी नीलाचंद पाटील, जितेंद्र विकास पाटील व पूर्वा राजेंद्र महाजन ९१%, चहक सुहास अग्रवाल ९०.८०%, संविधान प्रमोद पाटील ९०.४०%, रिया संजोग साळुंखे ९०.२०%, मयुरेश्वर कैलास बाविस्कर ९० % या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. शाळेच्या या घवघवीत यशाबद्द्ल यशस्वी विद्यार्थाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रविंद्र जैन, सगळे विश्वस्त, मुख्याध्यापक व पालक यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content