नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून ‘स्टॉप मर्डर ऑफ डेमोक्रसी’ आणि ‘संविधान की हत्या बंद करो’ अशी घोषणाबाजी सुरु असतांना मार्शलनी धक्काबुक्की केल्याची तक्रार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच महिला खासदार राम्या हरीदास आणि ज्योतिमणी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
सभागृहात पोस्टर घेऊन नारेबाजी करणारे काँग्रेसचे खासदार हिबी इडेन आणि टी. एन. प्रतापन यांना नियम ३७३ अंतर्गत सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले होते. त्यानंतर लोकसभेतील मार्शलनी महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे के. सुरेश आणि भाजपच्या खासदारांनी मध्ये पडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ-गदारोळ वाढल्यामुळे लोकसभेचे कामकाज बिर्ला यांना दिवसभरासाठी स्थगित करावे लागले होते.