जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी सोनखेडी येथे एक लाखासाठी शिवीगाळ करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता पतीसह सासरच्या मंडळी विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कोल्हे हिल्स येथील बाहेर असलेल्या पूजा नितीन पाटील वय-२४ यांचा विवाह अमळनेर तालुक्यातील सोनखेडी गावातील नितीन प्रभाकर पाटील यांच्याशी झालेला आहे. दरम्यान पती याने नवीन दुचाकी घेण्यासाठी बाहेरून एक लाख रुपये आणावे अशी मागणी केली होती. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाहीत. या रागातून पतीने शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच यांनी देखील पैशांसाठी छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी कोल्हे नगर येथे निघून आल्या. त्यानंतर त्यांनी बुधवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती नितीन पाटील, दीर हर्षल प्रभाकर पाटील, सासू निर्मला प्रभाकर पाटील, ननंद सविता नवल पाटील आणि नंदोईभाऊ नवल फकीरा पाटील सर्व रा. सोनखेडी ता. अमळनेर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाहीत मनीषा उमराणे करीत आहे.