तीन लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या विवाहितेला बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या पौर्णिमा भुषण साळुखे (वय-२२) यांचा विवाह यावल तालुक्यातील चिंचोली येथील भुषण अशोक साळुंखे यांच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती भुषण साळुंखे यांनी विवाहितेला माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी शवीगाळ व दमदाटी करण्यास सुरूवात केली. आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैसे देवू शकत नाही असे सांगितल्यावर शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच अशोक जयराम साळुंखे, जयश्री अशोक साळुंखे, ललीत अशोक साळुंखे, आकाश अशोक साळुंखे सर्व रा. चिंचोली ता. जळगाव यांनी देखील पैश्यांसाठी विवाहितेचा छळ केला. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकुर हे करीत आहे. 

 

Protected Content