यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी विवाहितेचा गांजपाठ करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “यावल शहरातील बाबानगर येथील माहेर असलेल्या शाहिस्ताबी सय्यद जुबेर यांचा विवाह भुसावळ येथील सैय्येद झुबेर अहेमद सैय्यद खलील अहेमद यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरूवातील सासरच्या मंडळींनी चांगली वागवणूक दिली. त्यानंतर विवाहितेला बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. त्यानंतर सासू, सासरे, दिर, नणंद, दिराणी यांनी देखील पैशांसाठी गांजपाठ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता यावल येथे माहेरी निघून आल्या. सोमवार ६ जून सायंकाळी धाव घेवून तक्रार दिली.
विवाहितेच्या फिर्यादीवरून पती सैय्येद झुबेर अहेमद सैय्यद खलील अहेमद, सासरे खलील अहेमद मोहसीन, सासु फातेमाबी सैय्यद खलील, दीर मुजम्मिल खलील, दिराणी नुजतबी मुजम्मिल, नणंद नुजतबी मर्द गफुरखेर, नणंद इयशत परविन खलील सर्व रा. भुसावळ यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.