जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा घर घेण्यासाठी पैसे आणावे यासाठी पती व सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आयोध्यानगरातील रहिवासी रागिनी प्रशांत केने (वय-३८) यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे, त्यांचे लग्न शेगाव (अमरावती) येथील प्रशांत मधुकर केने यांच्या सोबत झाले असून लग्न झाल्यानंतर काही दिवसांपासुन पती प्रशांतसह सासु प्रमीला, जेठ दिनेश (रा.सर्व. दत्तकृपा कॉटनग्रीन कॉलनी, शेगाव) अशांनी प्रशांतसाठी पुण्याला घर घेण्यासाठी रागिनी यांनी माहेरुन पैसे आणावे यासाठी तगादा लावला होता. मात्र, माहेरची परीस्थीती नसल्याने पैसे देवू शकत नाही असे सांगितल्यावर छळ सुरूच ठेवला. पती प्रशांत दारु पेऊन आल्यावर माहेरुन ५ लाख रुपये आण. यासाठी मारहाण होत असल्याने रागिनी यांनी माहेर गाठले. एमआयडीसी पेालिसांत दिलेल्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक विजय पाटिल करत आहेत.