जळगाव प्रतिनिधी । जळगावातील माहेर असलेल्या विवाहितेला कौटूंबिक कारणावरून शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रामानंद नगरातील जीवन नगरात माहेर असलेल्या भाग्यश्री नरेश बऱ्हाटे (वय-२९) ह्या पती नरेश दिगंबर बऱ्हाटे यांच्यासह यावल तालुक्यातील फैजपूर येथे वास्तव्याला आहे. सोबत सासू व सासरे राहताता. गेल्या मार्च २०२० पासून घरात कौटूंबिक वाद सुरू होता. या वादामुळे घरातील वातावरण बिघडले होते. दरम्यान पती नरेश बऱ्हाटे यांनी विवाहितेला मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. त्यानंतर पती नरेश याने विवाहितेला जीवे ठार मरण्याची धमकी दिली. त्यानंतर विवाहिता जळगाव माहेरी निघून आल्यात. याप्रकरणी विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती नरेश बऱ्हाटे, सासू अर्चना दिगंबर बऱ्हाटे आणि सासरे दिगंबर भास्कर बऱ्हाटे सर्व रा. फैजपूर ता. यावल यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहे.