हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कोल्हेनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा हुंड्यांच्या पैशांसाठी मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील कोल्हेनगर येथील सुनयना विवेक बोंडे वय २७ यांचा नाशिक जिल्ह्यातील कामतवाडे येथील विवेक नथ्थु बोंडे यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नानंतर पतीसह सासू व सासरे यांनी सुनयना हिस हुंड्याच्या पैशांची मागणी केली. तसेच याचकारणाावरुन सुनयना हिस वेळावेळी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने सुनयना ह्या माहेरी निघून आल्या. व त्यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मंगळवारी सुनयना हिचे पती विवेक नथ्थु बोंडे, सासू विजया नथ्थू बोंडे, सासरे नथ्थु काशिनाथ बोंडे, तिघे रा. वावरेनगर, कामतवाडे, नाशिक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहेत.

Protected Content