लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । लग्नात हुंडा कमी दिला म्हणून माहेरहुन घरखर्चासाठी २५ लाख रूपये आणावे यासाठी तालुक्यात कासवा येथील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कासवा येथे माहेर असलेल्या काजल सुनिल परदेशी यांचा विवाह जळगाव तालुक्यातील रायपूर येथील सुनिल भगवान परदेशी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान लग्नात तुझ्या वडीलांनी हुंडा कमी दिला आहे. तु माहेरहून घर खर्चासाठी पंचविस लाख रूपये आणावे अशी मागणी पती सुनिल परदेशी याने विवाहितेला सांगितले. परंतू वडीलांची घरीची परिस्थिती हालाखीची असल्याने एवढे पैसे देवू शकत नसल्याचे विवाहिता यांनी सांगितले. यावरून पती  सुनिल याने विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सासू, सासरे, जेठ, जेठाणी, चुलत जेठ आणि नणंद यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. सुरूवातील विवाहितेने महिला दक्षता विभागात तक्रार दिली होती. त्याठिकाणी देखील पती हजर राहत नसल्यामुळे अखेर बुधवारी १३ ऑक्टोबर रोजी महिलेच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात पती सुनिल भगवान परदेशी, सासू रेखा भगवान परदेशी, सासरे भगवान शेनफडू परदेशी, जेठ विजय भगवान परदेशी, जेठाणी सिमा विजय परदेशी, नणंद आशा प्रविण परदेशी, चुलत जेठ मनोज चावदास परदेशी सर्व रा. रायपूर ता. जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर पाटील करीत आहे.

 

Protected Content