पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथील २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील २४ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह राहतात. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता तरूणी घरात एकटी असतांना संशयित आरोपी सुनिल भगवान पाटील याने घरात अनाधिकृतपणे घरात प्रवेश करून तरूणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धिरज मंडलीक करीत आहे.