व्यापाऱ्याला लुटणारे भुसावळचे आरोपी सुरतमध्ये पकडले

 

 

भुसावळ : प्रतिनिधी |  सहप्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला लुटणारे भुसावळचे ३ चोर भुसावळ पोलिसांनी सुरतमध्ये जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडून आणले आहेत

बाजारपेठ  पोलीस ठाण्यात फिर्यादी व्यापारी सुनील माखिजा ( रा – सिंधी कॉलनी , भुसावळ ) यांच्या फिर्यादीवरून  गु.र.नं. १०३/२०२१ भांदवि  कलम ३७९,३४ नुसार ७ मार्च  रोजी   दाखल करण्यात आला होता.

 

सहाय्यक .पोलीस अधीक्षक   अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोलीस पथक तयार करून सुरत येथे रवाना केले  सुरत क्राइम ब्रांच यांची  मदत घेऊन  संशयित आरोपी  युसूफ शेख ,  महेश सपकाळे यांच्याकडून  लुटून हिसकावलेल्या ५० हजार रुपयांपैकी १४ हजार रुपये व  संशयित आरोपी  संम्स   अन्सारी यांचेकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली  पाच लाख रुपये किंमतीची  एरटिगा व्हॅन  हस्तगत करण्यात  आली

 

ही  कारवाई  पोलीस अधीक्षक  डॉ.प्रवीण मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक  चंद्रकांत गवळी , उप.विभागीय पोलिस अधिकारी  सोमनाथ वाघचौरे,  सहाय्यक पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोहेकॉ  विकास सातदिवे, पोकाॅ  प्रशांत परदेशी   यांनी केली त्यांना  सुरत क्राइम ब्रांचचे  सहाय्यक फौजदार संजय पाटील,  रविद्र माळी. यांनी सहकार्य केले

 

 

या  कापड व्यापाऱ्यास जळगाव येथे सोडून देण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळील 50 हजार रुपयांची चोरी  आरोपींनी केली होती

 

सुनील माखिजा यांचे जळगावात जय माता दि रेडीमेड या नावाचे होलसेल कपड्यांचे दुकान आहे. 6 मार्चला  ते भुसावळ येथुन जळगावला दुकानावर 50 हजार रुपये देण्यासाठी नाहाटा चोफुली येथे बस थांब्यावर आले. तेथे एक पांढ-या रंगाची इर्टीगा कार येवून थांबली. चालकाने कोठे जायचे आहे विचारून, जळगाव येथे सोडून देतो असे सांगितल्याने माखिजा हे गाडीत बसले. ओव्हर ब्रिज पास करुन सुभाष गरेज समोर कार चालकाने कार उभी करुन गाडीत दाटी होत आहे. असे सागून कारच्या खाली उतरवून दिले. त्यानंतर पन्टच्या खिशात तपासले असता, 50 हजार रुपये दिसले नाही. त्यामुळे तीन अनोळखी इसमांविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

Protected Content