Home क्राईम व्याजाच्या पैशांवरून दोघांना बेदम मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

व्याजाच्या पैशांवरून दोघांना बेदम मारहाण; तिघांविरोधात गुन्हा


Crime l 2

जळगाव प्रतिनिधी। व्याजाचे पैसे देण्यास मनाई केल्याने दोघांना तिघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास स्टार पॅलेस हॉटेल जवळ घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिसात बापासह दोघे मुलांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की कुंदन सुधाकर चौधरी व 32 रा. नवजीत सोसायटी महाबळ परिसर आणि त्याचा मित्र प्रशांत दत्तू पाटील हे शहरातील हॉटेल स्टार पॅलेस येथे जेवनासाठी बसले होते. कुंदनने गोलू रामचंद्र कोल्हे यांच्याकडून पाच लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्याचे व्याज म्हणून गोलू कोल्हे याने कुंदनकडे गेल्या अनेक दिवसांपासून तगादा लावला होता. गुरूवारी 6 जून रोजी रात्री 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये जेवणासाठी बसलेल्या कुंदन आणि त्याचा मित्र प्रशांत दत्तू पाटील यांच्याजवळ गोलू कोल्हे व त्याचा मित्र सोबत घेऊन पैशाची मागणी केली. पैसे देण्यास कुंदनने नकार दिल्यामुळे गोलू कोल्हे यांच्यासह मित्र दिपक याला गोलूने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गोलूचा भाऊ मयूर कोल्हे आणि वडील रामचंद्र कोल्हे हे हॉटेलच्या बाहेर उभे होते. दोघांची हातापायी बाचाबाची होत असल्याचे पाहून दोघांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. कुंदनच्या वरच्या खिशात बारा हजार रुपये रोख असलेले पैसे खाली पडल्याने ते सुद्धा त्यांनी हिसकावून पलायन केले. जिल्हापेठ पोलिसात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound