इंग्रजीच्या प्रभावाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष होता कामा नये – प्रा विनोद भालेराव

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील ‘तालुका विधी सेवा प्राधिकरण’ येथे ‘तालुका विधी सेवा समिती’ आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चा समारोप व्याख्यानाने करण्यात आला. यावेळी ”इंग्रजीच्या प्रभावाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष होता कामा नये” असे प्रतिपादन प्रा विनोद भालेराव यांनी केले.

भुसावळ येथील ‘तालुका विधी सेवा प्राधिकरण भुसावळ’ येथे ‘तालुका विधी सेवा समिती’ आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यात “मराठी भाषेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. चक्रधर ज्ञानेश्वरांपासून ते आताच्या ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडेंपर्यंत मराठी समृद्ध झालेली आहे. या भाषेने आपले वेगळेपण जोपासले आहे. साहित्यातून माणसे घडतात, संस्कारित होतात त्यामुळे पैजा जिंकण्याची ताकत मराठी भाषेत असून इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होता कामा नये.” असे प्रतिपादन प्रा.भालेराव यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळचे जिल्हा न्यायाधीश आर.एम.जाधव हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय ॲड.आय.आय.खान यांनी केला तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.विक्रम शेळके यांनी केले.

Protected Content