विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे  सुप्रसिध्द कवी किरण येले यांच्या व्याख्यानाने  मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा गुरुवारी समारोप झाला.  पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. 

ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे होते.  तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार होते.  या वेळी बोलतांना प्रा.पवार यांनी मराठी भाषेशी निगडीत क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठया संधी असल्याचे सांगितले.  किरण येले यांनी मराठीत भाषांतराला मोठा वाव असून इतर भाषांमध्ये नवीन शब्दांचा जसा अंतर्भाव होत असतो.  तशी नवीन शब्दांची निर्मिती मराठीत होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कवी होण्यासाठी आधी माणूस व्हायला हवे असा सल्ला त्यांनी दिला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रा उपाध्ये यांनी केले. प्रा.आशुतोष पाटील यांनी आभार मानले.

 

 

Protected Content