यावल प्रतिनिधी । शहरात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत हिंदु स्मशानभूमीच्या आवारात तरुण युवक मराठी अस्मिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून दि. 7 ऑगस्ट रोजी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाच्या रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली सामाजिक बांधलकी जोपासून वृक्ष लागवडीच्या राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा व आपल्या कर्तव्याच्या दुष्टीकोणातून सामाजिक व विधायक कार्याचा ध्यास डोळयासमोर ठेवून तरूणांनी जबाबदारी ओळखली पाहिजे असे मनोगत या वृक्षारोपणाप्रसंगी मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन आढळकर यांनी व्यक्त केले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी, मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन अढळकर, उपाध्यक्ष प्रशांत कासार, सचिव सुनील गावडे, सहसचिव नितीन बारी, कोषाध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी अस्वार, ॲड. देवेंद्र बाविस्कर डॉ. सागर चौधरी, संदीप कुलकर्णी, प्रमोद देवरे व विशाल बारी सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थितीत होते.