Home राज्य मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचे निधन

मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचे निधन


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी सिनेसृ्ष्टीतील प्रसिद्ध अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे त्यांचा निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना दादरमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गोळाबेरीज, बायकोच्या नकळत यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. एक अभ्यासू नट, एक अभ्यासू दिग्दर्शक अशी क्षितीज यांची ओळख होती.एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून क्षितिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.


Protected Content

Play sound