मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने चाळीसगावात आनंदोत्सव

chalisgaon new

चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला लागू केलेले आरक्षण आज न्यायालयाने मान्य करून त्यावर शिक्कामोर्तब केला असल्या कारणाने चाळीसगाव शहरात संभाजी सेना व मराठा समाजातील तरुणांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमून फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंद साजरा केला.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यात सामील होते. संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, दिलीप घोरपडे, के.बी.साळुंखे रामचंद्र जाधव, योगेश पाटील, खुशाल पाटील, मुराद पटेल, सुनील पाटील, अजय जोशी, अविनाश काकडे, शुभम चव्हाण, संदीप देशमुख, बंटी पाटील, मनोज भोसले, बाळासाहेब खत्ती, शुभम साळुंखे, संदीप जाधव, राहुल पाटील, गणेश पाटील, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, रवींद्र शेवाळ, निलेश पाटील, डॉ.संदीप पाटील, पृथ्वीराज पाटील, दीपक परदेशी, छोटुभाऊ पाटील, हेमंत पाटील, राकेश निकम, कैलास पाटील, सचिन जाधव, लक्ष्मण बनकर, रवींद्र जाधव, अरविंद पाटील, किरण पांगारे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content