भुसावळात मराठा नेते मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ मराठा समाजाने कुठल्याही नेत्याच्या नादाला लागु नये ही लोक आपल्यात फुट पाडतील, यांच्या पासुन चारहात लांबच रहा आणि त्या ओबीसी नेत्याच ऐकु नका,त्याला मी बघुन घेतो.त्याला मी सोडणार नाही पार ऊलटा पालटा करतो असे छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे पाटलांनी भुजबळांवर ताशेरे ओढले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर दौर्‍यावर निघालेले जरांगे पाटील आज भुसावळ येथे आले असता भुसावळ सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे नहाटा चौफुलीवर जंगी स्वागत करण्यात आले. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन आलेल्या पाटलांवर फुलांची ऊधळण करुन महिलांनी औक्षण केले. यावेळी हजारो मराठा बांधव ऊपस्थित होते. ढोल ताषे व शिवरायांच्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय झाले. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, जिव गेला तरी आंदोलन मागे घेणार नाही, तुम्ही माझ्या पाठीशी ऊभे रहा. मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज नाही तर कधीच नाही. जे रक्ताचे नाहीत ते आपल्या विरुध्द आहे. तुम्ही रक्ताचे तरी एकत्र या.मराठ्याच्या भविष्यासाठी एकत्र या. पुढची पिढी तुमचे ऊपकार विसरणार नाही. घरा घरात मराठे एकत्र करा. पुढच्या वेळी भुसावळला संपुर्ण एक दिवस देईल तेव्हा पाच किला मीटर दुतर्फा रांगा लागायला हव्यात अशी ताकद सरकारला दाखवा असे आवाहन जरांगे पाटील  यांनी केले. निरोजित वेळे पेक्षा चार तास उशिराने अर्थात दुपारी २ वाजता त्यांचे आगमन झाले असता जंगी स्वागत करण्यात आले. सर्व प्रथम कारगिल युध्दात शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन व्यासपीठावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. नंतर सकल मराठा समाज व खान्देश कुनबी समाजाच्या वतीने भलामोठा हार घालुन जरांगे पाटील यांचे स्वागत केले गेले. या वेळी महिला भगिणीनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पाच ते सात मिनिटं सत्कार व तीन मिनिटांचे भाषण करुन जरांगे पाटील हे वरणगावच्या दिशेने रवाना झाले. व्यासपीठावर समाज बांधवांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर आमले व आनंदा ठाकरे यांनी केले.

मंत्र्याने जातीवाद करु नये दोन समाजात वाद होता कामा नये. त्यांना काय करायचे ते करु द्या त्यांना मराठ्यानीच मोठं केल आहे. त्याला मीच वठणीवर आणतो असा भुजबळांचा नामोल्लेख टाळत एकेरी शब्दात समाचार घेतला.

 

Protected Content