जळगाव प्रतिनिधी । मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने एका निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या जळगाव शाखेने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे आज तरुण राज्यातील सुमारे २५० तरुण तरुणींना राज्यात किंवा देशात कोठेही शैक्षणिक संधी मिळणार नसून राज्य शासनाच्या चुकीच्या कारभाराची ही तरुणाई बळी पडली आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून न्याय देण्याची मागणी या निवेदनावर करण्यात आली आहे.
निवेदन देतांना मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदू पाटील, अॅड. अनिल पाटील, अॅड. सचिन चव्हाण, प्रमोद पाटील, योगेश पाटील, देवेंद्र मराठे, अजित पाटील, कृष्णा पाटील, प्रतिभा शिंदे, किरण पाटील, अॅड. विजय पाटील, राजेश पाटील, दीपक पाटील, सागर पाटील, संजय पवार, हेमंतकुमार साळुंखे आदींची उपस्थिती होती.